शमशेर खान यांची एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष पदी वर्णी,राजकीय समीकरण बदलणार

उमरखेड विधानसभा बळकट करण्याच्या हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात मजलीसे इत्तेहादूल मुस्लिम (AIMIM) पक्षात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थित AIMIM पक्षात प्रवेश केला होता. आज AIMIM यवतमाळ जिल्हा अध्यक्ष
सय्यद इरफान यांनी शमशेर खान लाला यांची प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्हा उपा अध्यक्ष पदा वर नियुक्ती केली आहे. शमशेर खान हें राष्ट्रवादी चा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जात होते. आता त्यांच्या खांद्यावर AIMIM पक्षाच्या जिल्हाची जवाबदारी आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. शिवाय AIMIM ने विधानसभा निवडणुकानाचे वारे वाहत असतांना पार्टीने शमशेर खान यांना पुढे करून उमरखेड विधानसभा बळकट करण्याची खेळी पक्ष श्रेष्टीने खेळल्याचे बोलल्या जात आहे.
उमरखेड च्या एका कार्यक्रमात शमशेर खान यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती चें पत्र जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी बहाल केले. यावेळी महागाव तालुका अध्यक्ष फेजान लाला , फुलसावंगी शहर अध्यक्ष शेख जमान, आरिफ नवाब सह उमरखेड कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते