
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव ते रानवड रस्त्याच्या होणाऱ्या हाल अपेष्टेमुळे दोन्ही गावांतील शेतकरी मेटाकुटीला आले असून या गावातील शेतकऱ्यांना नियमित वापरायचा रस्ता,शेतीत जायचा रस्ता अत्यंत निंदनीय असून हा रस्ता पाहिल्यावर आपण स्वातंत्र्यात आहे कि पारतंत्र्यात आहे हेच कळत नसल्याचे दोन्ही गावांतील शेतकरी सांगत असून अधिकारी, आमदार वारंवार विनंती करूनही लक्ष देत नाही आणि आपल्याला शेतीत गेल्याशिवाय मार्ग नाही असं गृहीत धरून एकदा दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी वर्गणी काढून रस्ता दुरुस्ती केला परंतु परत या रस्त्याची अशीच अवस्था झाली असून हे सरकार खरोखरच शेतकरी हिताचे आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून एकीकडे बहिणींना लाडकी बहिण योजना देत असताना दुसरीकडे मात्र आपल्या भाऊजीचे या निमित्ताने हाल करत असून दोन्ही गावांतील शेतकरी शेतमजूर कंटाळले आहेत.बरेचदा विनंती करूनही साधा रस्ता दुरुस्ती होत नाही तर आपण यांना मतदान करून निवडून द्यायचे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून ताबडतोब या रस्त्याचा मार्ग आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके यांनी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा रस्ता ताबडतोब दुरूस्त करून देण्यात यावा अशी मागणी पिंपळगाव व रानवड येथील शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.