
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व नशामुक्ती भारत अभियान अंतर्गत व अखिल भारतीय महिला संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 2अॉक्टोंबर 23 भारत रत्न स्व.लाल बहादूर शास्त्री व गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती सप्ताहा निमीत्ताने महिला मेळावाचे आयोजन.महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ पुरस्कृत राळेगाव येथे सर्वसाधारण (GEN) प्रवर्गातील युवती व महिला व पुरुषांकरिता अन्न प्रक्रीया प्रशिक्षण शिबीरात जिल्हा यवतमाळ संघटक सौ.रोशनीताई वानोडे / कामडी यांनी व्यसन मुक्ती संदर्भात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.सौ.संतोषीताई रा.वर्मा यानी समाजात होणारे व्यसनचे प्रकार व त्यावर उपाय हे उपस्थित महिलां मध्दे चर्चा सत्र चांगलेच रंगले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या .कार्य क्रमाचे प्रस्तावना सौ.संतोषीताई वर्मा तर आभार सौ.गायत्री खुनकर यांनी केले .
