
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस जवळ काही दिवसा पूर्वी एका अज्ञात महिलेचा मृत देह सापडला. त्या नंतर या परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता मन सुन्न करणारे सत्त्ये उजेडात आले. या घटनेत मृत महिलेचा पतीचं खुनाचा सुत्रधार निघाला.
दारव्हा तालुक्याच्या शेलोडी येथील पूजा अनिल कावळे ही विवाहित तरुणी 10 नोव्हे ला पुण्याला जाण्यासाठी निघाली. मात्र ती पुण्याला पोहोचलीच नाही . त्यामुळे मृत महिलेच्या भावाने या प्रकरणी पोलिसात आपली बहीण हरवल्याची तक्रार दिली। त्या नंतर 16 नोव्हे ला दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत काही नागरिकांना दिसून आले. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्या नंतर पोलीस पथक घटना स्थळी दाखल झाले.आणि महिलेची ओळख पटविण्यासाठी हालचाल सुरू केली .हरवलेल्या महिलेच्या प्रकरणातील फिर्यादी भोजराज पंजाबराव वानखडे यांनाही या बाबतची माहिती दिली . त्यावरून मृत महिला ही पूजा अनिल कावळे असल्याचे निष्पन्न झाले. आणि तिचा खून झाल्याचे प्रथमदर्शी लक्षात आल्या नंतर पोलिसांनी आरोपी चा शोध घेण्यास सुरुवात केली.या तपासा साठी स्थानिक गुन्हे सायबर सेल सह चार पथकाची मदत घेण्यात आली.घटनास्थळावर सबळ पुरावे आढळून न आल्याने हे प्रकरण अतिशय क्लिष्ट झाले.त्यामुळे पोलीस समोर उलगडा लावण्याचे मोठे आव्हान उभे झाले.अशातच पोलीस पथकाने अतिशय सय्यम बाळगून मृत महिलेच्या बाबतची गुप्त माहिती घेण्यास सुरुवात केली असता हळू हळू या प्रकरणाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली.सर्व चौकशी अंती हा गुन्हा चार संशयित आरोपीने केल्याचं उघड झाले.उज्वल पंढरी नगराळे, गौरव रामभाऊ राऊत, अभिषेक बबन म्हात्रे या तिघांना एकाच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या नंतर त्यांच्या कडून जी माहिती मिळाली ती सर्वांनाच अवाक करून ठेवणारी आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृत महिलेचा पती अनिल रमेश कावळे हाच असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलाम 302 नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल ,यांनी केली. मात्र मुख्य सूत्रधार अजून पोलिसांच्या हाती लागला नाही. तरी अधिक तपास पोलिस करीत आहे.
