हिवाळी क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

महात्मा गांधी विद्यामंदिर पंचवटी संचलित नाशिक
के बी एच विद्यालय पवननगर सिडको नाशिक येथे हिवाळी क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
मा. मुख्याध्यापक उमेश देवरे सर यांच्या मार्गदर्शनाने हिवाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सहा दिवसांसाठी विद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गात बेसबॉल, सॉफ्टबॉल, ड्रॉप रो बाॅल तसेच कबड्डी या खेळाचे खेळाडू सहभागी झाले आहेत सदर शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक उमेश देवरे सर,मा. उपमुख्याध्यापिका मा. युगंधरा देशमुख मॅडम,
मा. पर्यवेक्षक प्रदीप हिरे सर* यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पवार सर, विजय निकम सर, विशाल कदम सर, पी. एस. शिंदे सर तसेच इतर शिक्षक बंधू शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर बंधू-भगिनी उपस्थित होते* सदर प्रशिक्षण वर्गास विद्यालयाचे क्रीडा प्रमुख रवींद्र साळुंके सर यांचे मार्गदर्शन होणार आहे