गुजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

श्री गुरुदेव सेवा मंडळ र न 973 व समस्त ग्रामस्थ गुजरी, तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ द्वारा सोमवार दिनांक 18 डिसेंबर ते बुधवार दिनांक 20 डिसेंबरला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराचे प्रांगणात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा व वैराग्यमूर्ती सद्गुरु गाडगे महाराज यांचा 67 वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित असून दैनिक सकाळी 5 वा. ग्रामसफाई ,6 वा सामुदायिक ध्यान ,सायंकाळी 6 वा सामुदायिक प्रार्थना ,भजन ,कीर्तन, विविध मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहे. दि सोमवार 18 डिसेंबरला सकाळी 9 वा श्री जानरावभाऊ गिरी नगराध्यक्ष न पं राळेगाव यांचे शुभ हस्ते उद्घाटन पर श्री विलासराव भोयर यांचे अध्यक्षते खाली प्रदीप ठुने, रामभाऊ नागपुरे ,हमीदभाई पठाण ,मधुकरराव गेडाम, कृष्णराव राउळकर ,रामभाऊजी कोवे ,उमेशराव भोयर ,गोविंदराव झोड ,पी डी मेंडुलकर यांचे उपस्थितीत झेंडावंदन व महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 8 ते 11 वा संत एकनाथ महाराजांचे संगीतमय भारुड सादरकर्ते गणेश शिंदे व संच नेरी दि मंगळवार 19 डिसेंबर सायंकाळी 8 ते 11 वा हरिभक्त परायण तुषार सूर्यवंशी सप्तखंजिरी वादक नागपूर यांचा मनोरंजनात्मक व प्रबोधन पर विनोदी ग्रामगीतेवर राष्ट्रीय कीर्तन, दि 20 डिसेंबर बुधवार ला सकाळी 7 ते 10 वा तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे प्रतिमेची भजन दिंडी सह शोभायात्रा दुपारी 12 वा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर डफर महाराज यांचे काल्यावर कीर्तन, 1 वा समारोपिय कार्यक्रम, चित्तरंजनदास कोल्हे, प्रशांतभाऊ तायडे, डॉ कुणालभाऊ भोयर , विनोदभाऊ काकडे, राजूभाऊ तेलंगे ,ज्ञानेश्वर मुडे,गणेश फटिंग, अरुण खंगार ,शेअरअली बापू लालानी ,रुपेश रेंगे ,यांचे उपस्थितीत व 3 वा महाप्रसाद होईल.