चिकणी गावातील तरुणांना वाट शिपाई पदाच्या भरतीची,

दोन वर्षाआधी नोटीस काढूनही भरती नाही?

वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायतमध्ये दि. 30 मार्च 2021 या तारखेला जाहिरात काढण्यात आली . दोन वर्षाचा कालावधी होऊन , अद्यापही शिपाई या पदाची भरती न करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे . गावातील उच्चशिक्षित तरुण शिपाई पदाच्या भरतीची वाट पाहत आहे.

चिकणी ग्रामपंचातमध्ये 9 सदस्य गण असून त्यामध्ये दोन वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा जूनही शिपाई पदाची परीक्षा घेण्यात आली नाही . अंदाजे 23 ते 24 बेरोजगार युवकांनी ग्रामपंचायत चिकणी येथे रीतसर अर्ज दाखल केला . या अर्जाची अद्यापही दखल ग्रामपंचायत चिकणी ने घेतलेली नाही. पंचायत समिती वरोरा येथील संवर्ग विकास अधिकारी ( B D O ) यांनी जातीने या प्रकरणात लक्ष देणे गरजेचे झाले आहे. आधीच बेरोजगारीने त्रस्त युवकांना शिपाई पदाची नोकरी म्हणजे “मरते को तिनके का सहारा” हे ब्रिद वाक्य खरे ठरणार आहे .

       

या प्रकरणी गावातील तरुण हताश झाले आहेत.लवकरात लवकर ही भरती घेत गावातील तरुणांना गावातचं रोजगार मिळवून द्यावा अशी तरुणांची मागणी आहे.