
कृषिकन्यांनी गुटी कलम तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, कलम करण्याची प्रक्रिया याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच गुटी कलम करण्याचे फायदेही समजावून सांगितले.
या प्रात्यक्षिकासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. महाजन, समन्वयक डॉ. तायडे विषय तज्ञ डॉ अनिल भोगावे,मिली पुसदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिकन्या वैष्णवी नेरकर, काव्या पडाला, श्रुती पराते, प्रांजली शिंदे, रोहिणी मस्के, तनुजा नंदागवळी, नंदिनी नांदे, फाल्गुनी नन्नावरे यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
