
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 30-03-2024 ला बोरिमहल ता.कळंब येथे स्पेक्ट्रम कॉट फायबर एल.एल.पी.वर्धा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन गावातील पोलीस पाटील निरंजन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.स्पेक्ट्रम कॉट फायबर एल.एल.पी.द्वारा राबवण्यात येणाऱ्या उत्तम कापूस निमिर्ती प्रकल्प (बीसीआय) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामाजिक कार्य या प्रिन्सिपल अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला गावातील सरपंच,पोलीस पाटील जि.प.प्रा.शाळेतली शिक्षक वृंद व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची टीम तसेच पियु व्यवस्थापक नरेश बाजरे,फील्ड फॅसिलेटर वैभव इजपाडे,लक्ष्मण येडस्कर,संदीप जगताप, वैभव मेघल,प्रियंका ओंकार व वैभवी वाकडे उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत येथील कर्मचारी वर्ग तसेच शाळे मधील विद्यार्थी व गावातील शेतकरी,शेत मजूर वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
