
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
वरोरा:—
एकीकडे सरकार मागेल त्याला लस
देण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे विशिष्ट लोकांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे ठेवले जाते, असे असूनही लस मिळत नाही अशी अवस्था बोर्डा येथील लसीकरण केंद्रावर झाली आहे. लसीकरणासाठी केंद्रावर सकाळी 8.30 वाजता पासून उभे राहून सुद्धा लस प्राप्त होत नाही, तर नोंद वहीत आधीच 20 ते 25 लोकांची नावे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांकडून घरूनच नोंद करून आणल्या जाते , .दिनांक 17 जुलै रोजी बोर्डा येथील प्राथमिक शाळेत असणाऱ्या लसीकरण केंद्रावरअश्या च प्रकारचा कारभार सुरू होता, त्यांनंतर लसीकरण केंद्रावर प्रशांत बदकी ,तालुका सचिव मनसे यांनी विरोध केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .ही बाब त्यांनी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य व सरपंच मॅडम ना निदर्शनास आणून दिली .प्रत्येक केंद्रावर 100 नागरिकांचेच लसीकरण होत असल्याने इतर 75 लोकांनाच लस मिळत आहे. तर रांगेत असणाऱ्या लस न घेता आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. अश्याच प्रकार जर घडणार असेल तर मनसे लसीकरण केंद्रावर आपल्या स्टाईलने कारवाई करेल असा इशारा आज गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा ला निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.निवेदन देतेवेळी कुणाल गौरकार, सचिन मांडवकर, विकी येरणे,कल्पक ढोरे, पंकज दडमल व तालुका सचिव प्रशांत बदकी उपस्थित होते.
