
मेंघापुर सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील मेंघापुर येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मेंघापुर र.न.६११ या संस्थेचे. मानकर गटाचे सदस्य बिनविरोध सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यात सहकार क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून आपली पकड मजबूत करणारे नेते सहकार क्षेत्राचे राजे म्हणून राळेगाव तालुक्यात आपली ओळख निर्माण करणारे नेते मा.प्रफुल्ल भाऊ मानकर यांनी. युवा शेतकरी पँनलच्या नावाने मेंघापुर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर संचालक मंडळ उभे करून निवडणूक लढविण्याची तयारी केली. यात प्रफुल्ल भाऊ मानकर गटाचे उमेदवार १३ पैकी १२ उमेदवार अविरोध निवडून आले तर १ उमेदवार हा १६ मताने विजयी झाला असल्याने १३ पैकी १३ ही उमेदवार विजयी झाले आहे. यात कर्जदार गटातून नितीन विनायकराव काकडे, मधुकर नामदेवराव खडसे, हनुमान नामदेवराव खडसे,प्रविण वामनराव गोतमारे, प्रकाश जनार्धन डोंगरे,उमेश पांडुरंगजी बोरकर,दिनेश मारुती बोरकर,महेश दादाजी राऊत, तर अनु जाती जमाती मधून श्रावण नारायण वासेकर तर ईतर मागास प्रर्वगा तुन दिपक महादेवराव काकडे तर भटक्या विमुक्त जाती मधून उदेभान कीसनाजी नागपूरे तर महिला प्रतिनिधी म्हणून प्रभाताई मारोतराव हीवरकर व तानाबाई माधव चौधरी हे विजयी झाले. वरील सर्व विजयी उमेदवार यांनी आपल्या विजयाचे श्रेय सहकार क्षेत्राचे नेते मा. प्रफुल्लभाऊ मानकर व नितीन सुधाकरराव खडसे (सरपंच),शेखर डोंगरे,शंकर थुल,उमेश काकडे,मंगेश काकडे,श्रीकांत काकडे,अमोल ताकसांडे,योगेश नागपुरे,बंडूजी राऊत,संजय बोरकर यांना दिले तर निवडणूक अधिकारी म्हणून चौधरी मँडम,भगत साहेब,सोयाम साहेब, खरतडे साहेब, सचिव येडसकर साहेब, रुपेश ठाकरे,पंकज गावंडे, भेदुरकर यांनी काम केले.
