नवीन वर्ष धुंदीत नव्हे शुध्दीत साजरे करा


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ॲड.रोशनी वानोडे (सौ. कामडी) नशाबंदी मंडळ महा.राज्य यांनी महिला सक्षमीकरण ,व्यसनमुक्ती, व कायदेविषयक मार्गदर्शन केले.नवीन वर्ष धुंदीत नव्हे तर शुध्दीत साजरे करा असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.झाडे सर यांनी सुसंवाद असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविन चौधरी यांनी व्यसनापासून दुर राहण्याचा संदेश दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शीतल दरणे,आभार प्रदर्शन आदित्य नागमोथे यांनी केले.आकांशा वाघ,निकिता गंडे, प्रितम उईके या विद्यार्थ्यांनी व्यसनमूक्तीसाठी उपाय सुचविले.ग्रामीण भागात व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होत आल्याचे सांगितले. नशाबंदी मंडळ तर्फे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन पाहून व्यसनापासून दुर राहण्याचा संकल्प केला.