
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी रुपेश संतोषराव मुंगले वय ३८ रा धानोरा या शेतकऱ्यांने घरातील सर्व जन झोपले असल्याचे पाहुन शेतात फवारणी करीता आणलेले किटकनाशक प्राशन करुन जीवन यात्रा संपविली हि घटना २१ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली उपचारासाठी राळेगाव ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दिवाळी सारखा सण असतांना रूपेश ने विष घेतल्याने गावात मात्र सर्वत्र शोककळा पसरली होती. कोसुर्ला जिल्हा वर्धा शेत शिवारात ३ एकर कोरडवाहु जमीन असुन या वर्षी अती पावसाने शेतात लावलेले सर्व खरडुन गेले. तसेच सततच्या अती पावसाने होते नव्हते पूर्ण पिक उध्दवस्त झाले त्यात बँक आँफ इडींया शाखा कानगावचे पिक कर्ज तसेच अवैध कर्जाच्या चिंतेत असलेल्या या युवा शेतकऱ्यांने शेतात फवारणी करीता आणलेले विषारी किटकनाशक प्राशन करुन जिवन यात्रा संपविली त्याच्या मागे पत्नी एक मुलगा आई वडील असा आप्त परीवार होता व अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव हे करीत आहे.
