गांधी जिल्ह्यात गांधी जयंती पासून जुन्या पेन्शनसाठी आमरण उपोषणाला सुरुवात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वर्धा जिल्हा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून गांधीजींनी अनेक गोष्टी अहिंसेच्या मार्गाने जनतेला मिळवून दिल्या याच गोष्टीचा आधार घेऊन महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २ आक्टोबर २०२४ पासून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जून्या पेन्शनसाठी अनेक शिक्षक बंधू भगिनी आमरण उपोषणाला बसले असून या आमरण उपोषणाला पहिल्याच दिवशी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागाचे तडफदार आमदार सुधाकरराव अडबाले सर, प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींनी आपला पाठिंबा दिला असून या आंदोलनाला पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी सुद्धा भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.या आमरण उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक संघाचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहे. या आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची परीक्षा न पाहता ताबडतोब शासनाने दखल घ्यावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले सर, माजी शिक्षक आमदार व्हि.यू. डायगव्हाणे सर, प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.