दहेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत देवानंद काळे यांच्या दणदणीत विजय, विरोधी पॅनलचा धुव्वा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत वार्ड न १ चा पोटनिवडणुकीत, देवानंद काळे विरूद्ध सुनंदा रामपुरे असा सामना रंगला होता आज दि६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय राळेगाव येथे मतमोजणी करण्यात आली सदर मतमोजणी मध्ये ४३४ पैकी देवानंद काळे २७७ , सुनंदा रामपुरे १५१ , नोटा ६ असे मते पडले यामध्ये देवानंद काळे यांनी सुनंदा रामपुरे यांचा १२६ मतांनी दारुण पराभव केला,व देवानंद काळे यांचा दणदणीत विजय झाला याआधी वार्ड न १ मध्ये त्यांचे वडील नयलाल काळे सदस्य होते पण त्याचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त होती पण आता त्याचा मुलांच्या विजयामुळे त्याचे असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे व मला विजय करण्यासाठी सुदामराव बल्की माजी सरपंच, किशोर दातारकर, राधाबाई टेकाम सरपंच, कवडुजी मांडवकर ग्रा प सदस्य,सुनंदाबाई येडसे ग्रा प सदस्य, अमोल गमे, अभिषेक जिवतोडे, शंकर पंधरे, संदीप घोसले, नंदकिशोर टेकाम, जानराव फुटकी विठ्ठल जोगी, प्रफुल झाडे, अशोक खैरे, विनोद मेश्राम, सुरेंद्र पवार, सचिन पवार रामचंद्र मोरे, प्रभाकर जांभुळकर , संतोष जुमनाके,या सर्वांनी अति परिश्रम घेतले माझ्या विजयाचे श्रेय यांना व नागाई नागेश्वर दहेगाव या वार्ड न १मधील सर्व मतदार बंधु भगिना देण्यात येत आहे असे देवानंद काळे यांनी सांगितले