
वाशिम – शहरातील अकोला नाकाजवळील आनंदवाडी प्रभागातील नाल्याची साफसफाई, रस्तेदुरुस्ती आदी समस्यांकडे पालीकेने सातत्याने दुलक्ष केल्यामुळे दिलेल्या इशार्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आनंदवाडीतील रहिवाशांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर डफडे व ढोल वाजवून मोर्चा नेण्यात आला. यावेळी मुख्याधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, शहरातील आनंदवाडी परिसरात रस्ते, नाल्यासह इतर मुलभुत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. या प्रभागात नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेली हापशी अनेक महिन्यापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागरीकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. प्रभागात अनेक ठिकाणचे रस्ते नादुरुस्त आहेत. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन चालतांना नागरीकांना त्रास होत आहे. त्यामुळे सदर रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करणे अतिआवश्यक झाले आहे. यासोबतच प्रभागातील नाल्यांची नगर परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नियमित साफसफाई केल्या जात नाही. त्यामुळे परिसरामध्ये नाल्यांमध्ये सांडपाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागात उभारलेले इलेक्ट्रीक पोल अपुरे असून या ठिकाणी अधिक पोल उभारण्याची गरज आहे. या सर्व बाबीची दखल घेवून शहराचे पालक या नात्याने आनंदवाडी परिसरातील रहिवाशांना या मुलभूत सुविधा देणे ही नगर परिषदेची प्रशासकीय जबाबदारी आहे. या समस्येकडून न.प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र रहिवाशांच्या मागणीकडे न.प. प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मनसेच्या वतीने लोकशाही पध्दतीने डफडे वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, शेतकरी सेनेचे रघुनाथ खुपसे, मालेगाव तालुका उपाध्यक्ष गजानन कुटे, सुरेश चौंढकर, विभागअध्यक्ष संतोष वैरागडे, पवन डुबे, शाखाध्यक्ष बाळु वानखेडे, उपाध्यक्ष आकाश जिरवणकर, देवा खरे, मोहन राऊत, समाधान खरे, शिवाजी पडघान, शंकर बांगर, शशिकला खडसे, कामिनी कांबळे, छाया इंगळे, मनकर्णा पडघान, कल्पना खरे, मंगला कांबळे, साजनबाई बांगर, सुनिता अढागळे, शालीनी इंगळे, गंगा खरे, व्दारका खडसे, सुनिता राऊत, ज्योती खरे, निलेश इंगळे, सुकेशिनी राऊत, रवि निखाडे, नितीन गुडदे, अंकुश गुडदे, सागर खरे, राजु शिराळ, प्रभु इंगळे, अक्षय अढागळे, शैलेश चव्हाण, नंदु राऊत, शांता इंगळे, राहुल मेतकर, संगीता तेलगोटे, अमोल खरे, रुद्र खरे, शिवराज बांगर, महादेव गायकवाड, शुभम खरे, केशव खरे, मदन बांगर, नेन्सी कांबळे, सुमित्रा इंगळे आदी उपस्थित होते.
