
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी.. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवागतांचा प्रवेश सोहळा दिनांक ३० जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, २०२३/२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ शालेय पुस्तक आणि चॉकलेट देऊन याचे स्वागत करण्यात आले, ढाणकी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी पुष्पगुच्छ चॉकलेट आणि शालेय पुस्तक देऊन चिमुकल्यांचे स्वागत केले, तर शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अनिल गायकवाड, जॉन्टी विणकरे , अशोक मोरे, संतोष गोपेवाड, सविता कानंदे, प्रीती पराते, यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले,
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता, कार्यक्रमाची संचलन श्री शरद बचाटे यांनी केले, उत्तर प्राथमिक मुख्याध्यापिका जवळेकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेळके सर यांनी केले, यावेळी भावना निमजे,बल्लाळ मॅडम, सुनीता लुटे मॅडम,गोकुळ राठोड,केंद्रे सर, प्रतापवार सर सर्व शिक्षक शिक्षिका तथा पालक वर्ग उपस्थित होता
