
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे जिल्हा परिषद यवतमाळचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्रजी काटोलकर यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील विज्ञान विषय प्रमुख सीमा देशमुख, देवेंद्र मून, ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनीचे उत्तम नियोजन करून विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू, खेळण्यातील वस्तू यापासून चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून अतिशय कमी खर्चात कल्पकतेने विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित प्रात्यक्षिक, प्रतिकृती, माहितीपत्रकासह सहभाग घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक दिनकर उघडे यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनीचे रीतसर उदघाटन, वैज्ञानिकांचे प्रतिमापूजन करून विध्यार्थ्यांच्या प्रत्यक्षिकांचे परीक्षण केले. यावेळी परीक्षकांनी विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक व त्यांचे उपयोग जाणून घेत त्यांना अनुक्रमे माध्यमिक व प्राथमिक गटात प्रथम सुजल वाऱ्हेकर व करण मडकाम, देवर्षी भोयर तर द्वितीय क्रमांक चेतन कोवे, दक्ष शेजोळकर व संस्कृती मडावी, रीना झाडे तर तृतीय क्रमांक रिचीता नान्हे व ईश्वरी नान्हे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक व प्रतिकृतीसह शालेय विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी कुतूहल व उत्सुकतेने आयोजित विज्ञान प्रदर्शनीचा निरीक्षण करून लाभ घेतला.
शालेय विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका सीमा देशमुख, देवेंद्र मून, ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे, सलमा कुरेशी, प्रकाश अंबादे, विलास ठाकरे, अनंता परचाके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश नक्षिणे यांनी तर आभार योगेश मिटकर यांनी मानले.
