
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
मागील काही दिवसापासून बळीराजा ज्याची अपेक्षा करीत होता ती अपेक्षा आता संपली असून मृगाच्या अखेरीस मृगधारा बरसल्याने मशागतीच्या कामांना वेग येणार असून नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागत करून रान तयार केली असतांना मृगधार बरसेल ही अपेक्षा होती परंतु मृग नक्षत्राने दडी मारल्यामुळे बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरलेला नसताना अर्ध्या अधिक शेतकऱ्यांनी धुरळ पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी पेरणीचा आखूडता हात घेतला त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असताना काल दुपारनंतर तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्याच बरोबर उकाड्यापासून नागरिकांनाही दिलासा मिळाला असून या आलेल्या पावसाच्या सरीने आणखी शेतातील पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.
