महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी राळेगाव येथे जयंती साजरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी येथे जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली,
अन्यायाविरुध्द लढणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४एप्रील १८९१रोजी भारतातील महु येथील एका दलीत कूंटुबात झाला असून आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हनुन ओळखले जाते.त्यांनी भारत सरकारच्या सामाजीक न्याय मंत्रालयानुसार जागतिक दर्जाचे वकील,समाज सुधारक आणी प्रथम क्रंमाकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. त्यांच्याच जयंती निमित्त राळेगाव शहरात त्यांच्या पुतळ्यांना माला अर्पण करून सर्व समाज बांधवांनी मानवंदना दिली तसेच शहरात सकाळी lभीम जयंती निमित्त अल्पआहाराचे (मसाला भाताचे) आयोजन आंबेडकर चौकात करण्यात आले व संध्याकाळी शहरातून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली या रॅलीत शहरातील बौद्ध उपासक उपसिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते . त्यात शहरातील समाज बांधवांनी वेगवेगळ्या चौकात लिंबू सरबत वाटप तसेच अल्पआहाराचे आयोजन करण्यात आले शेवटी रॅलीचा समारोप आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.