राळेगाव येथे आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चे आयोजन

राळेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुल राळेगाव येथे 17 मार्च 2023 ते 19 मार्च 2023 या तीन दिवसयी आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ जिल्हा,ईश्वर शिक्षण प्रचारक मंडळ राळेगाव व भारतीय जनता पक्ष राळेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या पुढाकाराने घेण्यात येत आहे, यावर्षीचा आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 17 मार्च 2023 रोजी शुक्रवारला सायंकाळी सहा वाजता क्रीडा संकुल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असून या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गिरीश महाजन मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य हे असणार आहे, तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राजाभाऊ ठाकरे माजी खासदार अण्णा साहेब पारवेकर आमदार हे असतील तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन भुतडा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ, आमदार निलेश नाईक सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य ,
आमदार मदन भाऊ येरावार सदस्य विधानसभा यवतमाळ मतदारसंघ, आमदार संदीप भाऊ धुर्वे सदस्य विधानसभा केळापूर मतदारसंघ, आमदार नामदेवराव ससाने सदस्य उमरखेड विधानसभा उमरखेड मतदार संघ व आमदार संजूरेड्डी बोधकुलवार सदस्य विधानसभा वणी मतदार संघ ,
बाळासाहेब मांगुळकर अध्यक्ष हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ जिल्हा, माननीय अभय राऊत अध्यक्ष सुवर्णयोग क्रीडा मंडळ यवतमाळ , माननीय विश्वनाथ झिंगे सचिव हौशी कबड्डी असोसिएशन यवतमाळ, जिल्हा माननीय डॉक्टर शितल बल्लेवार प्राचार्य मार्कंडे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव तर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईकें माजी मंत्री आदिवासी विकास तथा सदस्य विधानसभा राळेगाव मतदार संघ आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असून तालुक्यातील समस्त नागरिकांनी या होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान आयोजक ईश्वर शिक्षण प्रचारक मंडळ राळेगाव व संयोजक भारतीय जनता पार्टी राळेगाव विधानसभा मतदार संघ राळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.