ढाणकी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलकांवर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथील झालेल्या अमानुष गोळीबार व लाठीचार्ज याच्या निषेधार्थ आज दि०३/०९/२०२३ रोजी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की अंतरवाली तालुका अंबड जिल्हा जालना येथील सकल मराठा बांधव कायदेशीर मार्गाने उपोषण करत असताना मराठा आरक्षणाची गरज असताना बांधवांच्या भावना समजून न घेता पोलीस प्रशासनाकडून अमानुषपणे लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला. त्यासंदर्भात सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत अशेच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चालू राहतील. मराठा समाज ही त्यांच्या न्याय व हककासाठी रस्त्यावर उतरलेला दिसेल. महाराष्ट्र सरकार हे मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.असे यावेळी आपल्या भाषणाद्वारे प्रतिकिर्या दिल्या गेल्या.सरकार विरोधात घोषणा दिल्या गेल्या.तसेच या आंदोलनाला काँग्रेस ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांतर्फे व संघटनेतर्फे जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला.