यवतमाळ येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तीन अंतर्गत सेलिब्रेशन ऑफ इंडिया का अमृत महोत्सव 2021 एक दिवसाचे प्रशिक्षण तांत्रिक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान बाबत माहिती प्रशिक्षण दिले.

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ सेलिब्रेशन ऑफ इंडिया 75 वा आजादी का अमृत महोत्सव दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तीन अंतर्गत सेलिब्रेशन ऑफ इंडिया का अमृत महोत्सव 2021 एक दिवसाचे प्रशिक्षण प्रशिक्षण तांत्रिक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान बाबत माहिती प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रावेरी येथील उपसरपंच व माजी सरपंच राजूभाऊ तेलंगे, ग्रामसेवक निकोडे साहेब रावेरी व ग्रामपंचायत पिंपळगाव सरपंच किशोरभाऊ धामंदे व सचिव अजय फाटे पिंपळगाव यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अभियंता सहारे साहेब यवतमाळ, गटविकास अधिकारी मडावी साहेब कळंब, ग्रामपंचायत रावेरी उपसरपंच राजूभाऊ तेलंगे, हे उपस्थित होते.