
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ राज्य आंदोलन समीती चे दोन दिवसीय अधिवेशन विदर्भाची राजधानी नागपूर येथे “आमदार निवास ” च्या प्रांगणात भरले होते,अकरा ही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी झाले होते अधिवेशन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित मा डॉ विकास महात्मे माझी खासदार, उद्घाटन मा विकास शिरपुरकर सेवा निवृत्त न्यायमूर्ती अँड वामनराव चटप साहेब माजी आमदार, दैनिक देशोन्नती चे संपादक मा प्रकाश भाऊ पोहरे यवतमाळ वरुन मा विजय जी निवल शेतकरी नेते,मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ मा रंजनाताई मामर्डे विदर्भ विरांगना महीला आघाडी, डॉ राजपूत साहेब प्रश्चिम विदर्भ प्रमुख आणि स्मरणिका सहसंपादक अमरावती,मा विजय जावंधिया, डॉ श्रीनिवास खांदेवाले साहेब मा अशोक वानखेडे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे पत्रकार ( टाईगर ) मा मधुसूदन कोवे गुरुजी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मा प्रा.पुरुषोत्तम पाटील वणी अँड, सुरेश वानखेडे, बुलढाणा, आणि दिलीपराव भोयर अमरावती यांनी पार पाडली, दोन दिवसीय अधिवेशनात सहा सत्र नियोजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यकर्त्यांना संधी म्हणून अधिवेशनात खुली चर्चा भरवली होती आणि अतिशय प्रभावशाली होती यात अकरा ही जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी मा मधुसूदन कोवे यानी १)शेतकरी आत्महत्या २) सिंचनाचा अनुशेष आणि ३)सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करण्यासाठी उद्योग , ४) कुमारी मातांचे वाढतं प्रमाण यावर उपाय योजना अशा अनेक प्रश्नांची चर्चा खुल्या अधिवेशनात करण्यात आली, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावं असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आणि देशाच्या महामहीम राष्ट्रपती,देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या साठी पाठविण्यात आला या दोन दिवसीय अधिवेशनात यवतमाळ जिल्ह्यातील भरपूर विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रामुख्याने गोविंद चव्हाण राउत साहेब, चारुदत्त नेरकर, मनोहर सहस्त्रबुद्धे , भास्कर महाजन सोनाली मरगडे, लता जयस्वाल, राजेंद्र झोटींग राहुल खारकर श्रीधर ढवस, मनोज भाई चमेडीया,अन्ना आनंदवार,दिग्रस,होमदेव कीन्हाके आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते दोन दिवसीय अधिवेशनात सहभागी झाले होते
