
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोहदा :- फुले स्मृतिदिन च्या निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन शाळा मोहदरी येथे करण्यात आले होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेशजी चव्हाण व मोहदरीचे सरपंच बाबारावजी धुर्वे हे उपस्थित होते याप्रसंगी आगामी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या खेळ महोत्सवासाठी महोत्सवाच्या गणवेशासाठी ग्रामपंचायत महोदरीतर्फे आदरणीय बाबारावजी धूर्वे यांच्याकडून तीन हजार रुपये व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ चव्हाण यांच्यातर्फे दोन हजार रुपये शैक्षणिक उठावंतर्गत शाळेला प्राप्त झाले शाळेतील व्यवस्थापन प्रशासन अतिशय उत्तम प्रतीने सुरू असल्याची पुस्ती सरपंच बाबारावजी धुर्वे यांनी जोडली तर निलेश भाऊ चव्हाण यांनी महात्मा फुलेंनी विद्येचं महत्त्व सांगितलं त्यावर आधारित समाज रचना तयार करावी लागेल असं नमूद केलं याप्रसंगी संचालन कैलास मडावी यांनी केले. उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक वरुडकर सर वाघदरे सर धुमाळे सर व गायकवाड सर उपस्थित होते
