तालुका प्रतिनिधी, प्रवीण जोशी ,उमरखेड
अनेक दिवसां पासुन उमरखेड तहसिल विभागां अतर्गंत पुरवठा विभागांतील सामान्य जनतेला गरज असलेल्या प्रश्नां विषयी कोणीच तहसिलदार ,संबधित पुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी अनेक दिवसां पासुन धान्य दुकानदार यांच्या मनमानी कारभाराचा वाढता त्रास सामान्य गरजुंना पडत आहे. कित्येक वेळा या बाबतीत तक्रारी झाल्यात परंतु कुठली हि सुधारणा अद्याप पावेतो झालेली दिसुन येत नाही . धान्य दुकाणदार अधिनियमाचे पालन करित नसल्याने त्यांच्या या बेताल वागणुकी विषया संताप व्यक्त होतो आहे .
पुरवठा विभागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी
मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर हि सामाजिक संघटना तहसिल प्रागणांत १४ नोव्हेबर रोजी या प्रश्नांना गती मिळवुन घेन्यासाठी आंदोलन करणार असल्याने हा प्रश्न सध्या तरी शहर व तालुका स्तरावर महत्वाचा ठरत आहे
संबधीत परवाना धारक दुकाण दार यांच्या कडुन पावती मिळालीच पाहीजे ,पात्रतेचे शिक्के व १२ अंकी नंबर लिहण्याची मोहीम राबवा दुकानावर वेळापत्रक व सुटी च्या दिवसा चे फलक लावा,
दुकानावर तक्रार पुस्तीका ठेवणे बंधनकारक करा, २५० कार्ड धारकांना एस ए एम एस व्दारे धान्य आल्या ची माहीती द्या, प्रत्येक दुकानावर ७ तारखेला अन्न दिवस साजरा झालाच पाहीजे,नागरिकांची सनद, कार्यालयात लावलीच पाहीजे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तक्रार कुठे करावी फलक लावा फलक लावा ,
विधवांना अंत्योदय कार्ड त्वरित सुरु करून त्यांना लाभ द्या ,
कार्यालयात कामाचा वेळ व दराची रक्कमेचे फलक लावा ,
कर्मचार्या कडून होत असलेला भ्रष्टाचार बंद करादलाला चा बंदोबस्त करा,इष्टांग वाढविण्यासाठी प्रयत्न झालाच पाहीजे झालाच पाहीजे
या आंदोलनात कार्यालयात तसेच संघटनेकडे तक्रारी दिलेल्या कार्डधारकांनी तसेच ज्यांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत अशा सर्व कार्ड धारकनागरिकांनी या लक्षवेधी धरणेआंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे च्या माध्यमातुन पदाधिकारी अन्सार हुसेनी , डॉ . फारुक अबरार , मोहसीन राज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
