आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या आठ दिवसात निकाली काढा अन्यथा २९ नोव्होबरला आंदोलन : सिध्दार्थ तेलतुंबडे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वर्धा शहरात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बैठक नुकतीच जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्याध्याक्ष दिलीप उटाणे कोषाध्यक्ष रतन बेंडे जिल्हा कार्याध्यक्ष वंदना उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनेक मागण्या प्रलंबीत आहेत अनेकदा निवेदन दिले मुकाअ यांच्या कक्षात अनेकदा बैठका झाल्यात १५ दिवसात कार्यवाही करतो आरोग्य प्रशासनाने त्यात फक्त आश्वासना पलीकडे काहीच केले नाही. २०१९ वर्षा पासून वेळकाढू धोरण घेतले . आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०, २०, ३० कालबध्द पदोन्नती. शासन निर्णय १ आँगस्ट २०१९ नुसार आरोग्य पर्यवेक्षक .आरोग्य सहाय्यक (महिला व पुरुष) रिक्त पदी पदोन्न्ती . गौळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी अफरातफर. कोवीड लसिकरणासाठी मोबाईट इंटनेट.लस टोचक व आँपरेटर ,लस वाहक भत्ता.लेखाशिर्ष २२११ च्या पदाची बिंदूनावली करा. इत्यादी प्रलंबीत मागण्या ८ दिवसांत निकाली काढल्या नाहीतर जिल्हा परिषदे समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करुन त्याचा निषेध नोंदविण्यात येईल असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे यांनी केले .
ते पुढे म्हणाले आरोग्य विभागातील पर्यवेक्षक .आरोग्य सहाय्यक (महिला व पुरुष ) हे पद शंभर टक्के पदोन्नतीचे असून सुध्दा पुर्ण रिक्त पदावर पदोन्नती मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. नुकत्याच झालेल्या पदोन्नत्या मध्ये आरोग्य विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभुल केली आहे.अशा आरोपही लावला, राज्य शासनाने पदोन्नती देताना काय खबरदारी घ्यावी १आँगस्ट २०१९ शासन निर्णय काढले परंतु त्या शासन निर्णयानुसार आरोग्य विभागाने प्रस्तावच केले नाही त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना अन्याय झाला आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना पदाधिकारी १४ आँक्टोबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या कक्षात चर्चा झाली शनीवार व रवीवार रोजी बसून १०,२०,व ३० वर्ष कालबध्द पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्यात यावे असे आदेश संबंधितांना मुकाअ डॉ सचिन ओंबासे यांनी दिले
परंतु आज पर्यत कुठलाही निर्णय झाला नसून आरोग्य कर्मचाऱ्यांन मध्ये संताप पसरलेला आहे
बिंदू नामावली नुसार एलएचव्ही च्या प्रशिक्षणा करीता आरोग्य सेविकांना प्राधान्य देवून प्रशिक्षणास पाठविण्यात यावे.
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरीत देण्यात यावी,
प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथिल अंशदायी योजनेतील (DCPS) कपात केलेली रक्कमेत केलेली अफरातफर बाबत चौकशी करण्यात आली ,परंतु बांधीत कर्मचाऱ्यांना रक्कम परत मिळालेली नाही ती त्वरीत द्यावी.
आरोग्य पर्यवेक्षक( स्त्री /पुरुष) यांच्या ११ पदे रिक्त आहेत . आरोग्य सहाय्यक (स्त्री) यांचे ११ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक (पुरुष) यांचे ३२ पदे रिक्त आहे .शभंर टक्के पदोन्नतीचे पद असल्यामुळे सर्व रिक्त पदावर पदोन्नती देण्यात यावे.कोवीड लसिकरणासाठी मोबाईलसह इंटरनेट मोबदला लसटोचक, आँपरेटर ,लसवाहक भत्ता उपलब्ध करुन देण्यात यावे इत्यादी मागण्या त्वरित आठ दिवसात निकाली काढले नाही तर किंवा जिल्हा प्रशासनाने बैठक घेवून निर्णय घेतले नाहीतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालया समोर कोवीड लसिकरणाचे काम बंद करुन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तरी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे जिल्हा कार्याध्यक्ष वंदना उईके जिल्हा सचिव दिपक कांबळे .उपाध्यक्ष सुजाता कांबळे संजय डफरे विजय जांगडे हेमत उघडे रतन बेडे अविनाश चव्हाण ममता कांबळे शालु कौरती रंगराव राठोड दिवाकर अडसर अमित कोपूलवार उमा चौधरी संजय डगवार प्रशात आंदमने राजेन्द धरमठोक बाबाराव कनेर शाम जोशी विठ्ठल केवटे आशा पेंदोर किरण पांडे निलेश साटोणे आशा धुर्वे प्रमोद धुडे शेख हुसेन विजय वांदिले विकास माणिककुडे उदय साळवे प्रशिल माटे रमेश रेवतकर सुर्यकांत वाघुले अशोक भुजाडे दिलीप धुडे दिनेश हराळे रंजना मुडे माला शिरपूरकर साहेबराव खंडार रमेश ठाकरे इत्यादीनी केले आहे.