
वणी :
” संस्कृत ही केवळ एक भाषा नसून प्राचीन भारतात विद्यमान असणाऱ्या अफाट ज्ञान सागराच्या अवलोकनाचा तो मार्ग आहे.
आज जर्मनी सोबत अनेक पाश्चात्य देशात फार मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेच्या आधारे संशोधन सुरू आहे.
नासा सारखी अग्रगण्य संस्था देखील संस्कृतचे महत्त्व मान्य करत आहे.
वणी सारख्या लहानशा गावात संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीचे कार्यकर्ते जे परिश्रम घेत आहेत ते खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहेत. ” असे विचार दैनिक हिंदुस्थान चे प्रतिनिधी परशुराम पोटे यांनी व्यक्त केले.
संस्कृत भारती लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या आभासी संस्कृत सप्ताहात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना ते बोलत होते.
आजच्या सादरीकरणामध्ये लीना रुपेश कपाटे हिने संस्कृत गीत सादर केले. ज्योती कोंडावार यांनी भजे व्रजैकमण्डनं कृष्ण गीत तर मानसी घेणे व माता हा निबंध सादर केला.
स्पर्श पराग चने याने मारुती स्तवन, शर्वरी किंबहुने हिने प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तर सिद्धी अभय जोशी हिने कथक नृत्य सादर केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैशाली अ
आसुटकर हिने आधुनिक संस्कृत कवी विद्याधर शास्त्री यांची माहिती सादर केली.
