
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव येथे न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिं ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती या विज्ञान प्रदर्शनीत सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नॅनोपवन चक्की या प्रतिकृती तयार करून द्वितीय क्रमांक मिळविला असून यावेळी नॅनो पवन चक्कीचे महत्व विशद करताना शाळेच्या विद्यार्थी वेदांत सुरेश भगत, व गौरव राजू वांढरे यांनी अतिशय समर्पक शब्दात सादरीकरण केले, तसेच तालुका नाटयोत्सवात सृष्टी फाले, प्राजक्ता किन्नाके, हर्षदा सीडाम, प्राची आत्राम, गुंजन, भैरवी वडुळकर, ओम किन्नाके, चेतन भोयर,या विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञान व शाश्वत विकास या विषयावर “मला बाजाराला जायचं” हे नाटक सादर करून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला असून त्यांनी मिळविलेल्या उपक्रमाबदल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले .
या उपक्रमाला शाळेतील मंगला आगरकर मॅडम स्मिता काळे मॅडम सोनल नासरे मॅडम व मुख्याध्यापिका डॉ भारती ताटे यांनी सहकार्य केले असून शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सुरकर व उपाध्यक्ष अतुल बेडदेवार यांनी मुलाचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास उपस्थित राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार, गटशिक्षण अधिकारी शेख लूकमान विस्तार अधिकारी सरलाताई देवतळे, तसेच बीआरसी चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
