
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
.राळेगांव हे शहर मोठी बाजारपेठ आहे.या तालुक्यात मोठा खेडे विभाग आहे.दर रोज तालुक्यातील जनता ये जा करतात येण्या जाण्या करीता बरेच लोक आपल्या दोन चाकी व चार चाकी वाहनाचा उपयोग करतात या मध्ये काही अल्पवयी मुले तर काही वयात आलेली ज्यांना अठरा वर्ष पुर्ण झाले असे विनापरवाना वाहन चालवीतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अशा लोकांना परवाना काढण्या करीता यवतमाळ RTO ला जावे लागत होते. यामध्ये त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात होते काही लोक यवतमाळला जाण्यास धजावत होती.अशा लोकासाठी वेळेची बचत व पैशाची बचत व्हावी मह्हणुन आनंद ड्रायविंग स्कुल राळेगावचे संचालक आनंद बोरकर सर व राळेगांव मतदार संघाचे आमदार उईके सर यांनी पाठपुरावा करुन २०१३ मध्ये राळेगांव शहरात RTO कैम्प आणला.प्रत्येक महीण्यात RTO कैम्प PWD Office च्या प्रांगणात सुरळीत चालु होता दर महीण्याला ४० ते ५० लोक अर्ज करत होते त्यामुळे तालुक्यातील गरीब श्रीमंत अशा दोन्ही लोकांचा फायदा होत होता. परंतु नोव्हेबर २०२२ पासुन कैम्प होणार नाही असे यवतमाळ RTO कडुन कळाले.स्लाटच्या ५०% लोक अर्ज करीत नाही त्यामुळे तालुक्यात गरज नाही असे त्यांचे मत आहे.
कैम्प बंद होण्यामागे तालुक्यातील जनतेचा सहभाग कमी पडला परंतु याला कारण हे की राळेगांव तालुका आदिवासी विभाग जास्त प्रमाणात आहे व या वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले पर्यायाने याचा परिणाम शेतकरी शेत मजुर व व्यावसायीक यांच्यावर झाला. व दोन महीने सतत पाऊस सुरु असल्यामुळे लोकांना येण्यास विलंब झाला मह्णून मागील दोन महीने अर्ज कमी होते . परंतु आता पावसाळा संपला आहे व जनता अर्ज भरण्यास येऊ लागली आहे .मा.उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्री हीरडे साहेब हे यवतमाळला प्रतिनियुक्तीवर नविन आहे त्यांना ह्या आदीवासी तालुक्याची माहीती नाही . काही निरीक्षकांच्या सांगण्यावरुन त्यांनी कैम्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कैम्प परत सुरु करण्या करीता तालुक्यातील लोकांनी जास्तीतजास्त अर्ज लायसेन्स काढण्या करीता भरावे .जेने करुन आम्ही RTO यवतमाळ यांनां कैम्प परत चालु करण्यास आग्रह करु असे मत आनंद ड्रायविंग स्कुलचे संचालक बोरकर सर व अरविंद तेलंगे सर यांनी केले.
