
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
यवतमाळ पांढरकवडा महामार्गावर उमरी थांब्या नजीक बुलेरो नी दुचाकी स्वारांला सामोरासमोर धडकेने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोघे मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताचे दरम्यान घडली.घटनेतील मृतकाचे नाव.शुभम महादेव बताले (२१) रा. डोंगरखर्डा ता.कळंब आहे.
आई सुरेखा महादेव बताले (४२) हे दोघे आपली नातेवाईक कडून अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून आपल्या एम.एच.२९ ए.एफ ५३९५ क्रमांकाच्या होंडा ट्विट मोटर सायकलने उमरी वरून मेटीखेडाकडे गावांच्या दिशेने निघाले होते.
विरूद्ध दिशेने येणाऱ्या (बुलेरो) चारचाकी क्रमांक एम. एच.२९. बी.क्यूव.७८६३ हा चारचाकी वाहन मेटीखेडा कडून पांढरकवडा कडे जात होता या दोन वाहनात जबर अपघात झाला. या दुचाकीस्वार दोन्ही माईलेकांचा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल बुलेरो वाहन दुचाकीवर सरळ येऊन आढळल्यामुळे दुचाकीवर बसलेले मायलेक गंभीर जखमी झाले. दोघांनाही जखमी अवस्थेत उमरी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.परंतु दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातानंतर मन मिळावु स्वभावाच्या शुभमच्या मृतघटनेची माहिती कळताच डोंगरखर्डा गावात शोककळा पसरली होती.या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी चालक मिनाज गैसुद्दीन सय्यद यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
