
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
विदर्भ राज्य आंदोलन समीती कार्यालयात ५ सप्टेंबर “‘ शिक्षक दिवस “‘ कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ नागरिक मित्र मंडळांनी आयोजित केला होता.या आयोजित कार्यक्रमाला सत्कार मुर्ती म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी “‘ विदर्भ गौरव पुरस्कार चे मानकरी ठरले आणि विशेष शिक्षक दिनी त्यांचा जन्म दिवस असल्याने हा अमृत योग समाज करण्यासाठी मा कृष्णा जी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ यांनी पुढाकार घेतला होता* *या अमृत योग सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.चंद्रशेखरजी ताम्हणे साहेब, सेवा निवृत्त अधिकारी ( एम एस इ बी ) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.एम .के.कोडापे.साहेब , सेवा निवृत्त अधिकारी ( बिग.एस.एन.एल.) यांची उपस्थिती होती. शिक्षकदिनाच्या निमित्ताने आणि जन्म दिनाच्या निमित्ताने आणि नुकताच मिळालेला “‘ विदर्भ गौरव पुरस्कार “‘ या अमृत योग सन्मान सोहळा “‘ कार्यक्रमात मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला होता* *उपस्थित मान्यवर प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि मा.चारुदत्त नेरकर साहेब.यानी सुंदर हिंदी फिल्मी गित गायन करुन शुभेच्छा दिल्या. अशा अमृत योग सोहळ्यात सहभागी मा.दिलिपसिंह गौतम साहेब , सेवा निवृत्त अधिकारी ( एसटी महामंडळ ) मा प्रल्हाद काळे सेवा निवृत्त मुख्याध्यापक मा सुरेश जी राठी ( कुशल शेतकरी ) मा रामु सेठ कलंत्री (श्री बिछायत चे मालक )मा अशोकराव कपिले मा अरुण भाऊ जोग , मा गिरी साहेब ,(कमर्शियल पतसंस्था ) मा संगिता पवार ,( दारुबंदी, व्यसन मुक्ती, नारीशक्ती )शुभम गिरी आणि सर्व सहभागी मित्र परिवार सहभागी झाला होता.या कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन कृष्णा भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ यांनी केले, आणि नास्ता पोहे जिलेबी,आलुबोंडे चहा पाणी देवुन आनंद उत्साहात हा सन्मान सोहळा यशस्वी केला.
