
एका कंटेनरसह ५१ लाख ४५ हजारांचा मुद्देमालासह चार आरोपी ताब्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
गुप्त माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी म्हशींना घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेऊन तब्बल ४७ म्हशींची सुटका केली.हि कारवाई राष्ट्रीय महामार्गावर १७ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान करण्यात आली असून याप्रकरणी ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरून प्राण्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाण्याच्या
हद्दीतील बोरी इचोड गावाजवळ सापळा रचला. दरम्यान नागपूर कडून येणाऱ्या एच आर ५५ व्हाय ३१७७ या क्रमांकाच्या कंटेनरची पोलीसांनी तपासणी केली असता त्यात तब्बल ४७ म्हशी आढळून आल्या. या प्रकरणी रिहान सफिक वय २२ रा,बागपत उत्तरप्रदेश,साहिल इदरीस वय ३४ वर्ष रा,सहरणपुर उत्तरप्रदेश,जावेद सल्लाउद्दीन वय ३२ मेरठ उत्तरप्रदेश,रहीस बाबू वय ३६ जगाव उत्तरप्रदेश,या चार आरोपीना वडकी पोलिसांनी कंटेनरसह ताब्यात घेतले असून त्यांचेवर प्राण्यांस निर्दतेने वागवीने या अधिनियमाखाली विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलीसांनी ४७ म्हशी व कंटेनर असा एकूण ५१ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्या सर्व जनावरांना वणी येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले.सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव,पोलीस हवालदार विनोद नागरगोजे, पोलीस नाईक विलास जाधव,विजय बसेशंकर,शंकर जुमनाके,उद्धव घुगे,अरविंद चव्हाण यांनी पार पाडली.
