तरुण युवकाची गळफास घेत आत्महत्या

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव वरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथील संजय विठ्ठल पुसनाके या २५ वर्षीय युवकाने दिं ६ मे २०२४ रोज सोमवारला आपल्या राहत्या घरी वेळवाच्या फाट्याला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीला बांधून सकाळी ११:०० वाजताच्या नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
ही माहिती संजय चे वडील विठ्ठल पुसनाके यांनी पोलीस स्टेशनला येवून दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर संजयचा मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णल्यात पाठविण्यात आला असून संजय पुसनाके यांच्या आत्महत्यांच्या मागचे कारण अद्याप कळले नसून फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून सदरचा मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.