

प्रतिनिधी..प्रवीण जोशी
यवतमाळ
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू असताना आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभावर चढून सुनील कदम, विशाल नरवाडे, प्रवीण धोपटे या तरुणांनी आंदोलन केले . आंदोलनाच्या दिवशी सगळीकडे शांतता असताना व शहरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू असताना हे युवक आपल्या मागण्या घेऊन जलकुंभावर चढून एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषना देते होते. व अशा घोषणेने अक्षरशः परिसर दणाणून गेला होता
पाणीपुरवठा होत असलेल्या जलकुंभावर चढलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्याकरिता यावेळी बाळासाहेब चंद्रे ,बळीराम मुटकुळे, विलास कवाने, गणेश नरवाडे, बंटी जाधव, उत्तम रावते, सुनील रावते, संभाजी गोरटकर, विक्रांत रावते, यांचे सह ढाणकी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या अकोली कृष्णापुर, कोप्रा, इतर गाव खेड्यातील सकल मराठा बांधव मोठ्या प्रमाणात एकत्रित झाला होता व जलकुंभाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात जमाव गर्दी जमली होती. अचानकपणे तरुण जलकुंभावर चढल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगली दमछाक झाली ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी आपली कार्यतत्परता दाखवत ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी येऊन आंदोलकांशी चर्चा करून वरिष्ठांना याबाबत भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. यावेळी जल कुंभावर चढून जे तरुण आंदोलन करत होते त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरिता नायब तहसीलदार पवार, मंडळ अधिकारी फटाले, तलाठी डोंगरे, यांनी आंदोलकांना जलकुंभावरून खाली उतरण्याची अनेक वेळा विनंती केली पण प्रशासनाने येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वसलेल्या सकल मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे व दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्यप्रशासना विभागामार्फत मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये जलदगती व सुस्थिती येण्यासाठी आणि यावर अभ्यास करून अहवाल देण्याकरिता ज्या समितीची नेमणूक केली गेली त्या समितीकडे संपूर्ण विदर्भाचा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात यावी व यात विदर्भाचा सुद्धा समावेश करण्यात यावा.
पुसद, उमरखेड, व महागाव, हे तालुके याआधी १९६० पूर्वी मराठवाड्याचा एक भाग असल्या कारणाने तालुक्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये तात्काळ समावेश करावा तसेच देशाचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेमध्ये आरक्षण मर्यादा वाढविण्याचे विधेयक तत्काळ मंजूर करून आरक्षण मर्यादा वाढवावी व मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात कोणत्याही अटी व शर्ती न घालता समावेश करून सकल मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाची तरतूद करावी व उमरखेड येथे २०१८या वर्षी झालेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांवर सरकारने जे गुन्हे नोंदविले होते ते सुद्धा मागे घेण्यात यावे तसेच अंतरावली सराटी येथे अत्यंत शिस्तबद्ध व शांततेने होत असलेल्या आंदोलकांवर लहान मुलांवर अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी अनेक वयोवृध्द नागरिक जखमी झाले याची न्यायालयीन चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. व दिनांक १ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या अंतरावरील सराटी येथे आंदोलन करत असताना निष्पाप लोकांना प्रशासनाने दोषी ठरवून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले ते सुद्धा मागे घेण्यात यावे तसेच उमरखेड येथील चालू असलेल्या आमरण उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा असून त्यांचे समर्थनार्थ आमचे हे आंदोलन चालू आहे आणि प्रशासनाने उमरखेड येथील आंदोलकांची तत्काळ दखल घेऊन ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी प्रशासनाकडे कळविण्याची मागणी केली आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाकडे पोहोचविणार असल्याचे आश्वासन दिल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करीत आहोत असे सुनील कदम, प्रवीण धोपटे, व विशाल नरवाडे, या तरुणांनी सांगितले
