
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटक
संजय कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी संघटन सृजन बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव येथे उत्साहात संपन्न झाली आहे
माजी शिक्षणमंत्री प्रा वसंत पुरके , जिल्हा अध्यक्ष ॲड प्रफुल्ल मानकर,
जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर, सह ७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघातील
सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि काँग्रेसचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
आज राळेगावच्या पवित्र भूमीवर आपण सर्वजण पक्ष संघटनेच्या सृजनासाठी एकत्र आलो आहोत. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर काँग्रेसच्या विचारधारेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि सामान्य माणसाचा आवाज मजबूत करण्याचा संकल्प आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत. पण हे वारसा तेव्हाच जिवंत राहील जेव्हा आपली संघटना मजबूत असेल आणि कार्यकर्ता सशक्त असेल.
राळेगाव तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे. इथे शेतकरी सततच्या निसर्गाच्या लहरी आणि बाजाराच्या अस्थिरतेला तोंड देत आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि काठावरच्या माणसाच्या न्यायासाठी लढा दिला आहे. तोच लढा आपल्याला आता संघटितपणे लढायचा आहे असं प्रतिपादन संजय कपूर यांनी केले आहे
आजची ही बैठक फक्त भाषणांसाठी नाही. तर बूथ स्तरापर्यंत पक्ष बांधणी कशी करायची?, तरुणांना कसे जोडायचे?, आणि लोकांच्या समस्यांना स्थानिक पातळीवर कसे सोडवायचे? यासाठी आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. तुमच्या मेहनतीवरच पक्षाची ताकद उभी राहते.
मला विश्वास आहे की मा. संजय कपूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण राळेगावमध्ये काँग्रेसची संघटना नव्या जोमाने उभी करू. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी जिल्हा काँग्रेस कमिटी खंबीरपणे उभी आहे असं मत प्रा वसंत पुरके यांनी केले आहे…..
विद्यमान जिल्हा अध्यक्ष यांना चं कायम ठेवावं असाच सुर बैठकीत दिसून आला आहे..
सभेचे संचालन शहर अध्यक्ष प्रदीप ठूणे, प्रास्ताविक ॲड प्रफुल्ल मानकर, आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी केले होते..
