
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. चे गटशिक्षणाधिकारी चंदभान शेळके हे नियत वयोमानानुसार (दि.31 में ) सेवानिवृत्त झाले.कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. सेवानिवृत्ती निमित्त प. स. कार्यालय राळेगाव येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी अनेकांनी त्यांच्या कार्याला उजाळा देणारे भाष्य केले.
अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते शिक्षक पेक्षात रुजू झाले, विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.त्यानंतर केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशी सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले.
शिक्षक म्हणून कामं करतांना त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता. अधिकारी म्हणून कामं करतांना सर्वांना सोबत घेऊन प्रशासनाचा गाढा यशस्वी रीत्या पुढे नेला. शिक्षकांना समजून घेतले मात्र जिथे गँभीर चुका झाल्या त्या ठिकाणी कर्तव्यकठोरता देखील दाखवली. त्यांच्या कार्यकाळात विविध शासकीय उपक्रमांची अंमलाबजावणी झाली. लोकसभा निवडणूक यशस्वी रीत्या पार पडली. शिक्षकांच्या तक्रारीचा निपटारा झाला. या त्यांच्या कार्याचा उल्लेख अनेकांनी केला. प. स. अधिकारी, शिक्षक, महिला भगिनीं व कर्मचारी वृंदानी त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
