वर्षाच्या सुरुवातीलाच तालुका स्तरावर सैनिक पब्लिक स्कूल वडकी चा दबदबा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथिल विद्यार्थ्यांनी _
लखाजी महाराज विद्यालय झाडगांव द्वारा आयोजित तालुका स्तरिय मुले मुली समुहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता ज्या मधे समुहनृत्या मध्ये चतुर्थ स्थान पटकावले या नृत्यामधे आर्या सोनवणे, श्रुतिका मांदाडे, मानवी चवरडोल, स्वरा गौळकर, आस्था घोटेकर व दक्ष खुराणा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांना ५,००० रू बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले
त्याच प्रमाणे राज्याच्या कला संचालनाय तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकाल ड्रॉइंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी – इंटरमिजिएट परीक्षा) घेण्यात आली होती या मधे वर्ग ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता या मधे शाळेतील २१ पैकी २१ विद्यार्थांना अव्वल दर्जा (ए-ग्रेड) मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना चित्रकला विषयात आवड निर्माण करण्यासाठी कला संचालनया तर्फे ही परीक्षा घेण्यात येते
समुहनृत व एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा या साठी मैफुज अली (कला शिक्षक) यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल शाळेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन, सचिव सत्यवान सिंग दुहन आणि प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) यांनी कौतुक केले..