गोंडवाना गणतंत्र पार्टीची कार्यकर्ता बैठक पार,तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते गोंडवाना गणतंत्र पार्टीत

1,


शहराध्यक्ष शमशोध्दीन युसूफ सय्यद, युवा मोर्चा पदी शहराध्यक्ष जंगु वेट्टी यांची निवड

तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते गोंडवाना गणतंत्र पार्टीत



जिवती तालुक्यातील गोंडवाना महाविद्यालय येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालुका च्या वतीने कार्यकर्ता बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंगपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी होते तर प्रमुख अतिथी म्हणून कोअरकमेठीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, प्रदेश अध्यक्ष (अल्पसंख्याक सेल) अब्दुल जमिर अब्दुल हमीद, प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडीचे गजानन पाटील जुमनाके, प्रदेश प्रवक्ता मेहबूब भाई शेख, माजी सभापती भिमराव मेश्राम, बाजार समितीचे संचालक ममताजी जाधव, जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्याक सेल) मुनिर सय्यद, युवा नेते संजूभाऊ सोयाम, संचालक निशिकांत सोनकाबंळे ,कृमरे मेजर, लक्ष्मण कुलसंगे, माजी सरपंच भिमराव सिडाम सह आदीची प्रामुख्याने उपस्थित होती.
या बैठकीत जेष्ठ नेते ममताजी जाधव यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून अनंता बावळे, सत्तार शेख, सोनेराव पेन्दोर तर सचिव पदी भिमरावजी मेश्राम, हनमंतू कृमरे, आनंदराव शेडमाके, नामदेव जुमनाके यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच जिवती शहर अध्यक्ष पदी शमशोध्दीन शेख तर युवा मोर्चा शहर अध्यक्ष जंगू वेट्टी,उपाध्यक्ष केशव कोहचाळे, कार्याध्यक्ष क्रिष्णा सिडाम, सचिव पदी अजिम सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षातील अनिल येवले, सुशिल गायकवाड, कयुब अब्बास अली शेख, भिल्लाजी उईके सह अनेक कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीत पक्ष प्रवेश केले.
यावेळी मारोती बेल्लाडे नगरसेवक,भिमराव पाटील जुमनाके, लक्ष्मण मगाम, केशव कृमरे, नारायण मोगीलवार, मतीन शेख, रवि कन्नाके, उत्तम पवार,शंकर सिडाम तसेच गोंडवाना गणंतंत्र पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
.