खैरी येथील गावात जाणाऱ्या रोडचे काम हे संथगतीने होत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत असल्याने रोडचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी खैरी ग्रामवासीयांनी रोडवर केले चक्काजाम आंदोलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

खैरी येथील वणी- वडकी रोडवरुन खैरी गावात व वरोरा कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे काम हे दिड वर्षांपासुन अतिशय संथगतीने होत आहे . त्यामुळे खैरी गावातील शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, तसेच वाहनचालकांना खूप त्रास होत आहे.रोडच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना किरकोळ दुखापती पण झाल्या आहे.तसेच याच रोडवरुन शाळेतील विद्यार्थ्यांना पण येजा करावी लागत असल्याने अनेकदा मोठ्या वाहनांच्या चाकातुन उतरुन विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागले असल्याने डोक्याला पण दुखापती झाल्या आहे.त्यामुळे आतातरी संथगतीने होणारे रोडचे काम हे जलद गतीने करून लवकरात लवकर रोडचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी खैरी गावातील ग्रामस्थांनी रोडवर बसुन चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. चक्काजाम आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी रोडचे काम हे सुरु करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.