प्रा. वसंत पुरके यांच्या आरोप राळेगाव येथे पत्रकार परिषद ठेवली आकडेवारी,नऊ वर्षात मोदी सरकार सर्व आघाडीवर अपयशी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सद्यस्थितीत भाजप सरकार मोदी ऍट नाईन अंतर्गत भारतभर विविध कार्यक्रम घेत आहेत नऊ वर्षात आम्ही काय केले हे जनतेला सांगत आहेत पण प्रत्यक्षात नववर्षात कुठली समस्या सुटली नसून शेतकरी शेतमजूर युवक व्यापारी यांच्या प्रश्न तसेच असून केवळ देखाव्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके म्हणाले या संदर्भात नुकतीच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगरध्यक्ष जानराव गिरी नगरसेवक कुंदन कांबळे कमलेश गहलोत दिलीप दुदगीकर अफसर सय्यद भानुदास राऊत सर गजानन पाल आदी उपस्थित होते नुकतेच प्रधानमंत्री यांनि समान नागरी कायद्याचा विषय भारतभर छेढला आहे काँग्रेसने सुद्धा यासंदर्भात राज्यामध्ये एक कमिटी नेमली त्या कमिटी मध्ये कुमार केतकर सहइतरही काही सदस्य आहेत ज्यामध्ये पुरके सर यांचा समावेश आहे या संदर्भात पुरके सर म्हणाले की भारत हा देश विविध अंगी आहे प्रत्येकाची भाषा खानपान पद्धती संस्कृती वेगळी आहे अशा देशांमध्ये समान नागरी कायदा हा विषय लागू करणे योग्य होणार नाही सुरुवातीला समान नागरी कायद्याचा मसुदा त्यांनी जाहीर करावा त्यावर चर्चा करावी व नंतरच समान नागरी कायदा लागू करावा केवळ चुनावी जुमला म्हणून समान नागरी कायद्याचा वापर भाजप करणार असल्याचा पुरके सर यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नउ वर्षात एक पत्रकार परिषद घेतली नाही मध्य प्रदेशात एका आदिवासी नागरिकावर भाजपचा कार्यकर्ता लघवी करतो व ते सर्व दूर व्हायरल करतो यावरही प्रधानमंत्री मोदी काही बोलत नाही संसदेचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्त व्हायला हवे होते ते त्यांनी स्वतः केले नऊ वर्षांमध्ये अनेक सरकारी बँका त्यांनी विकून टाकल्या सरकारी एजन्सीचे खाजगीकरण केले महिला कुस्तीपटूनचे लैंगिक लैंगिक शोषण होत असताना त्याला जबाबदार असणाऱ्या भाजप खासदाराविषयी मोदी एक शब्द बोलत नाही नोटबंदी सारखे तुगलकी निर्णय घेऊन मोदी देशातील जनतेला वेठीस धरत आहे मोदी सरकारला नव वर्ष झाले असताना काँग्रेसचे त्यांना नऊ प्रश्न आहेत किमान त्यांचे तरी उत्तर त्यांनी द्यावे पण कुठेही उत्तर द्यायचे नाही पत्रकार परिषद घ्यायचं नाही हा चेक कलमी कार्यक्रम मोदी राबवत आहे या या आधीच्या प्रधानमंत्री हे नियमित पत्रकार परिषदा घ्यायचे पण मोदींनी मात्र नऊ वर्षात कधीच पत्रकार परिषद घेतले नाही नवीन युवकांना संधी देण्याऐवजी सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणखी सर्व सामावून त्यांच्याकडून मानधनावर काम करून घेण्याची तयारी करत आहे शेतमालाला किमान आधारभूत किंमत ही अतिशय कमी दिली जाते आधी विषय पूरक सरांनी आकडेवारी सह पत्रकार परिषदेत माहिती दिली.