
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खडकी येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक १ डिसेंबर 2023 ते ८ डिसेंबर 2024 पर्यंत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ नामसंकीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व जागर किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आळंदी देवाची लातूर येथील कथा प्रवक्ते ह भ प भागवताचार्य राहुल महाराज गोरे यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान आयोजित केलेल्या भागवत सप्ताहात दररोज सकाळी ९ ते ११ ते रात्री ९ ते ११ भागवत कथा होणार आहे.नंतर दि ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गरसूळी जी,लातूर येथील सुप्रसिद्ध बाल युवा कीर्तनकार ह,भ,प श्री यशवंत महाराज कातळे पाटील यांच्या मधुर वाणीतून जागर कीर्तन होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमात पहाटे ५ वाजता काकडा आरती, सकाळी ६ वाजता दररोज गावातून रामधून,हरिकीर्तन,हरिजागर,सायंकाळी ५ वाजता हरिपाठ,रात्री ८ ते ९ भारुड
असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दिनांक ८ डिसेंबर रोजी ह भ प राहुल महाराज गोरे यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी करून दुपारी ३ वाजता गावातून भव्य पालखी सोहळा निघणार नंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करून या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खडकी गावातील समस्त गावकरी मंडळी प्रयत्न करीत आहेत.
