आष्टोणा येथे गुणामाता पुण्यस्मरण व महाशिवरात्रीच्या पर्वावर श्रीमद् भागवत कथा पर्व ज्ञानयज्ञ सप्ताह : अत्यंत भक्तिमय वातावणात मोठ्या उत्साहात साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

          

राळेगाव तालुक्यात आष्टोणा हे गांव धार्मिक कार्यात अग्रेसर असून वारकरी सांप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जाते वारकरी सांप्रदायाचा प्रत्येक कार्यक्रम/उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने या गावात साजरा करण्यात येतात. नित्यनेमाप्रमाणे याही वर्षी गुणामाता पुण्यस्मरण व महाशिवरात्रीच्या पर्वावर श्रीमद् भागवत कथा पर्व व ज्ञानयज्ञ सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन या गावात दि. १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान समस्त ग्रामवासी आष्टोना द्वारा आयोजित करण्यात आला.

या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कलश घटस्थापना श्री डॉ. सुरेश वामनराव महाजन यांच्या हस्ते पार पडला तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण कार्यक्रमाची देवपुजा, आरती श्री पंढरीनाथजी त्यंबकराव काकडे यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडली, संपूर्ण कार्यक्रमाचे विणेकरी ह.भ.प श्री भूपेश महाराज काकडे आष्टोना हे होते व संपुर्ण भजनांचा कार्यक्रम वारकरी भजन मंडळ आष्टोना यांच्या हस्ते पार पडला. मृदंगवादक ह.भ.प अमर महाराज ठाकरे होते दि.२० फेब्रुवारी २०२३ ला दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ह.भ.प गरुवर्य भागवतचार्य श्री संतोषजी महाराज जाधव यांचे काल्याचे जाहीर हरी कीर्तन करण्यात आले, कीर्तनानंतर लगेच आष्टोणा वारकरी भजन मंडळ, सर्व भजणी यांची गावात दिंडी प्रदक्षिणा निघाली, त्यानंतर ५ वाजता महाप्रसादा ला सुरूवात झाली रात्री ११ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला, संपूर्ण आष्टोणा गावांतील तसेच बाहेरगावां वरून आलेल्या भाविकांनी (अंदाजे ४५०० भाविक भक्तांनी) महाप्रसादाचा आनंद घेतला.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे सकाळी ३ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा पार पडला यांमध्ये प्रमुख वारकरी भजन मंडळ आष्टोना, तसेच बाहेर गावाहून आलेले असंख्य भजनी मंडळे, आणि आष्टोणा येथील सर्व भजनी मंडळांनी भक्तिमय वातावनात मिरवणूक काढून नंतर मंदिरा जवळ येऊन ह. भ. प. संतोष ज महाराज जाधव यांच्या शुभहस्ते दहीहंडी उत्सव साजरा करण्यांत आला,. संपूर्ण सातही दिवस आष्टोना हे गाव भक्तिमय झाले होते. या सप्ताहात दररोज कीर्तन काकडा भारुड असे अनेक कार्यक्रम पार पडत होते. आष्टोना हे गाव या सातही दिवसात हरिनामाच्या गजराने दुमदुमले होते.
या महाशिवरात्री उत्सवात संपूर्ण कार्यक्रम पार पडेपर्यंत कार्यक्रम स्थळी गावातील काला कमेटी, भागवत सप्ताह समिती यांनी संपूर्ण संयोजन व व्यवस्थापन सांभाळले. तसेच समस्त ग्रामवाशी, गावकऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

पिढ्यानपिढ्या दरवर्षी सुरू असलेला हा महाशिवरात्री महोत्सव कार्यक्रम यावर्षी खुपचं मोठ्या प्रमाणात अत्यंत आनंदाने साजरा झाला आणि युवकांनी जो पुढाकार घेऊन जी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला तो खरंच प्रशंसास पात्र आहे
पंढरीनाथ बोथले
वारकरी सांप्रदाय आष्टोणा.