
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वसंत जिनिंग प्रेसिंग राळेगाव येथे सहकार क्षेत्रातून बॅंक प्रतिनिधी म्हणून निवडून पाठविलेल्या सहयोगी सदस्य कोपरी वालधूरचे सरपंच मोहन नरडवार यांचा वसंत जिनिंग राळेगावचे अध्यक्ष नंदकुमार गांधी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, संचालक अंकित कटारिया, संचालक रामधन राठोड, संचालक सुभाष भोयर, रामभाऊ भोयर, केशवराव पडोळे, विजय पिंपरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी संपूर्ण उपस्थित मान्यवरांनी मोहन नरडवार यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या ते आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री वसंतराव पुरके सर, काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अडव्होकेट प्रफुल्ल मानकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अरविंद वाढोणकर, काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांना देत असून त्यांचा केलेला सत्कार हा निश्चितच संस्थेच्या हितासाठी उपयोगी लावू असे सत्काराला उत्तर देताना नरडवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
