बारव्हा गावाची आदर्शगावाकडे वाटचाल,आदर्शगाव ग्रामविकास सप्ताह निमित्याने गावकऱ्यांचे श्रमदान


दि .२ जुन २०२३ ला मौजा. बारव्हा ता.वरोरा येथे भव्य श्रमदान कार्यक्रम आदर्शगाव ग्रामविकास सप्ताह निमित्याने मा.जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी मा.भाऊसाहेब बऱ्हाटे मा .गजाननराव भोयर तालुका कृषी अधिकारी वरोरा मा.जोत्सना मेश्राम सरपंच बारव्हा मा .संध्या कारेकर उपसरपंच मा .किशोर चौधरी संचालक (विचार विकास सामाजिक संस्था ),मा.कमलाकर निखाडे ग्रा.प.सदस्य मा.वैशाली ढोबळे ग्रा.प सदस्य मा .प्रणिता वाघ ग्रा.पं सदस्य .मा.वाघमारे ग्रा.पं सदस्य मा.गोविंद ठोबरे ग्रामसेवक मा .डॉ.पुरुषोत्तम ढोबळे. पूजा कारेकार इ.मान्यवरांच्या उपस्थित स्मशानशभूमी येथे वृक्ष लागवडीकरिता १०० खड्डे खोदकाम व असलेल्या झाडाना दगडाचे आळे.लुज बोल्डर, दगडी बाध टाकण्याचे काम गावातील १०० महिला,पुरुष व मुले यांनी केले .
मौजा –बारव्हा हे गाव २४ मार्च २०२३ ला महाराष्ट्र शासन अंतर्गत आदर्शगावं योजनेत सहभागी झाले या दरम्यान गावात १५ मार्च २०२३ पासूनच मा .भाऊसाहेब बऱ्हाटे यांची ग्रामसभा झाली. मा.पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणाघेऊन गाव आपसातील मतभेत विसरून कामाला लागले गेली २ महिन्यांपासून गावात श्रमदानाचे काम अखंडित पने सुरु आहे .नुकतीच ५५ गावकर्यांनी हिवरेबाजार ,राळेगणसिद्धी येथे जाऊन गाव पाहणी केली व मा .पद्मश्री.अण्णा हजारे व मा .पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेतली या भेटीतून व गाव पाहणीतून गावाचा आनंद द्विगुणीत झाला व गावकरी जोमाने कामाला लागले तसेच प्रवेश प्रेरक कामातून पाणी पुरवठा विहीर खोलीकरण काम झाल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळाले उन्हाळात पिण्याच्या पाण्याची जी टंचाई निर्माण होत होती.त्यामुळे आदर्शगाव योजनेबद्दल लोकांचा विश्वास वाढला. त्यामुळे उत्साहाचे वातावरण गावात निर्माण झाले .
१जुन ते ७ जून हा ग्रामविकास सप्ताह कार्यक्रम राबविण्याचे गावकर्यांनी ठरविले व २ जूनला भव्य श्रमदान कामाचे नियोजन करून सकाळी ७ वाजता गावात मिरवणूक काढून शाळेकरी मुले ब्यांड वाजवीत व हातात मोठे बनर घेऊन निघाले पाठोपाठ सर्व वरील मान्यवर व गावातील सर्व महिला पुरुष हातात टोपले ,टीकास .विळा घेऊन श्रमदान करण्याकरिता मशान भूमीकडे निघाले.तिथे सर्वांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमणे महिलांनी पडलेले गोटे एकत्र करण्याचे काम केले .पुरुषांनी झाडांना आळे केले, गोट्याचे बाध टाकण्यात आले जवळपास १०० खडे खोदण्याचे काम करण्यात आले पाणी आला कि या खाद्यावर झाडे लावण्याचे गावकर्यांचे नियोजन आहे .अतिशय उत्साहाने गावातील सर्व स्त्री पुरुष रुद्ध एकमेकांना सूचना सल्ले देत काम करीत होते ,एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलत होते अनेक दिवसापासून एकमेकांना न भेटलेल्या महिला आनदाने एकमेकींची विचारपूस करीत होत्या श्रमदान करता करता मनेही जुळत जात असल्याचे चित्र दिसत होते.आजपर्यंत असे काम आह्मी कधी केल नाही आज आह्मला खूब आनद होत असल्याच्या प्रतिक्रिया महिला पुरुष देत होते १० .३० ला गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ कार्यक्रमाची सागता करण्यात आली .या प्रसंगी प्रणिता वाघ ,वैशाली ढोबळे , बाळकृष्ण वाघमारे ,गोविंद ठोबरे ग्रामसेवक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या मा.भाऊसाहेब बऱ्हाटे जि.अ.कु.अ. यांनी मार्गदर्शन केले आज श्रमदानाचा हा सोहळा पाहून मला अतिशय आनद झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावला दिलेल्या संधीचे नक्कीच गावकरी सोण करतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला .गाव समृद्ध होण्यासाठी शेती विकसित होणे आवश्क आहे व त्यासाठी माती आणि पाण्याचे योग्य नियोजन करून उत्पादकता वाढविणे खर्च कमी करणे ,विविध शेतीपूरक व्यवसाय निर्माण होणे गरजेचे आहेत .तसेच शेतीमालाल योग्य भाव मिळाले पाहिजेत यासाठी सुध्या काम करण्याची गरज आहे .आपया कडे मुख्य पिक कापसाचे आहे. या कापसापासून धागा बनतो व त्या पासून कापड हे कापड वापरण्याचे प्रमाण वाढले पाहिजेत यासाठी त्यांनी मा.गांधी यांनी सागीतलेल्या स्वदेशी वस्तू वाप्परचे महत्व पटवून दिले या प्रसंगी त्यांनी कापसाची गावातील जेष्ठ नागरिक सौ .सुरेखा कारेकर यांचे हस्ते पूजन करणात आले व विदेशी कापडाची होळी करण्यात आली .मा .गजानन भोयर ता .कु .अ यांनीही आपले मत व्यक्त केले सर्वांचे केलेल्या कामाचे कवतुक केले .मा .किशोर चौधरी यांनी सर्वांनी मिळून केलेल्या कामाची स्तुती केली.श्रमदान हे महादान असून त्यामु ळे आपुलकी ,प्रेम ,जिव्हाळा वाढतो ,भेदभाव कमी होतो माणसाला नम्रता शिकविते अस्या शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले .श्री.गोविंद ठोबरे ग्रामसेवक यांनीही सर्वाचे अभिनंदन करून आभार मानले अशीच एकजूट कायम राह्लीतर गावाचा नक्की विकास होयील आह्मी सोबत आहोत असे मत व्यक्त केले .सर्वांना नास्ता देऊन कार्यक्रमाची सागता करणात आली या कार्यक्रमाच्या येशावितेसाठी सर्वी श्री कमलाकर निखाडे ,बाळकृष्ण वाघमारे ,वैशाली ढोबळे ,प्रणिता वाघ ,संध्या कारेकर ,शुभम वाघमारे (ग्राम कार्यकर्ता ).छगन ढोबळे ,पूजा कारेकार.स्प्नील ढोबळे ,प्रणय लढी ,मिलिंद क्षीरसागर ,मयूर मडकाम, कुणाल मडकाम, शादुल क्षीरसागर ,नयन लढी ,कार्तिक कामडी,माधुरी वाघमारे ,संगीता मडकाम मीरा मडकाम शोभा मडावी ,कल्पना मडावी सुरेखा आत्राम तसेच विचार विकास संस्थेचे ममता वेलंगंधवार कुणाल सुलभेवार,सोनाली व्यापारी ,सुषमा चाफले इ मोलाचे सहकार्य केले.