
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
भारताचा इतिहास आणि विश्वात सविधान हे खूप मोठे आहे आणि आजच्या मितीला याची जाण असणारे काही हातावर मोजके लोक आहे त्यातील एक राजकारणी लालकृष्ण अडवाणी होय पण ते आता वय आणि वयाच्या असणाऱ्या अडचणी मुळे पक्षात किंवा राजकारणात कुठेही आढळत नाही त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी व स्वतःच्या पक्ष वाढीसाठी घालविले हे सत्य नाकारून चालणार नाही भाजप पक्षाला मोठ करण्यात माझी उपपंतप्रधान अडवाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थातच देशाचे पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी नंतर असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही अडवाणी याची योग्य निर्णय घेण्याची क्षमता व चाणाक्ष बुद्धी आणि वेळप्रसंगी तिखट विचारसरणी ते तत्कालीन जनसंघापर्यंत ते भाजपचा प्रवास नक्कीच अवघड होता. पण एवढ्या कठीण काळात सुद्धा तो प्रवास त्यांनी कायम ठेवून पक्ष निष्ठा व नेतृत्व कसे असावे हे दाखवून दिले.
पक्षांतर्गत बाबीकडे कधीही कुरकुर अडवाणी यांनी केली नाही व कोण्या पदाचा अट्टाहास सुद्धा धरला नाही. जे पद व कामगिरी वाट्याला येईल ते तेवढ्याच प्रामाणिकपणे करून त्या बाबीला योग्य न्याय दिला.संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात मोलाचा वाटा सहभाग आहे या त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे विरोधी पक्षाचे नेते सुद्धा त्यांच्याबद्दल आदर ठेवून बोलतात व विरोधी सुद्धा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करतात यावरून त्यांच्या विचारांची उंची कळते. तसे बघता देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती पद सुद्धा भूषवायला हवे होते पण दुर्दैवाने हा क्षण त्याच्या नशिबी येऊ शकला नाही पण त्याचे शिष्य असलेले नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद त्यांच्याकडे खेचून आणले. पण एवढा मोठा राजकारणाचा गाढा अभ्यास व अनुभव असतांना सुद्धा त्यांना बाजूला जावं लागलं काहीही असो.. मोदी सरकारने सत्तेच्या सरते शेवटी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिला हे सुद्धा काही कमी नाही व लालकृष्ण अडवाणी याचा हा केलेला यथोचित सन्मान योग्यच आहे. म्हणून सरकार अभिनंदनास पात्र आहे.
