
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
२०१९ मध्ये प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून सेंद्रिय शेतीला सुरुवात. सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे सेंद्रिय शेती विषय माहिती व कल्पतरू शेतकरी गट रिधोरा यांची मीटिंग संपन्न सविस्तर वृत्त असे विषमुक्त अन्न व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रकाशभाऊ पोहरे यांनी २०१९ मध्ये एक संकल्प केला होता.या संकल्पाला शासनाने मंजुरी देऊन २०१९ पासून प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सदर या प्रकल्पाच्या महासंघाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत तर नागपूर विभागातील एका जिल्ह्यात असे एकुण सहा जिल्ह्या मध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला सुरुवात करण्यात आली. सदर एकंदरीत तालुका लेवलवर चाळीस कंपन्यांची उभारणी करण्यात आली असून सदर या चाळीस कंपन्यां मिळुन एक महासंघ तयार करण्यात आला आहे. व या महासंघाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ पोहरे हे असुन यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.सदर आरोग्याच्या दृष्टीकोनातून सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही.
तालुक्यात इच्छुक शेतकऱ्यांचे गावोगावी सेंद्रिय शेती बाबत माहिती देवून गट स्थापन करून या मधिल एका व्यक्तीची तालुका स्तरावर असलेल्या सेंद्रिय शेतीच्या कंपनीचे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली व यांच्या माध्यमातून तालुक्यातील सेंद्रिय शेती बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून मार्गदर्शन केले जात आहे.सदर उत्कृष्ट सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते सदर या प्रकल्पासाठी २०१९ मध्ये प्रकाशभाऊ पोहरे यांनी सेंद्रिय शेती बाबत शासना समोर प्रस्ताव मांडला होता याला शासनाने मंजोरात देवून हा सेंद्रिय शेतीचा प्रकल्प अमलात आला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या महासंघाचे (अध्यक्ष )प्रकाश भाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव तालुक्यात हा प्रकल्प राबवीत असल्याची माहिती कृषक राज जैविक मिशन कंपनी राळेगाव चे (अध्यक्ष ) नरेंद्र केवटे यांनी दिली सदर रिधोरा येथिल सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन व शेती बाबत माहिती देताना गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच कल्पतरुक शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष हरिष काळे, गजानन पवार (सचिव), अनंतराव वाढंई, हीरालाल काळे,राजु ठेंगणे,सुकचंद वाढंई, विलास पवार,कवडु राऊत,कीशोर ठेंगणे, ओमप्रकाश ढोले, कृष्ण महाजन, मोरेश्वर ठेंगणे, उमेश जवादे, विष्णु महाजन,प्रकाश गाऊत्रे,चिंधु वाढंई, नामदेव सातघरे, पंकज राऊत, मुरलीधर काळे, वासुदेव ठेंगणे,गनेश ठेंगणे उपस्थित होते
