

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यानी संपुर्ण भारत भर लोककल्याणकारी कामे केले असुन ,त्यातीलच एक एक सोनगांव ता निफाड येथे ऐतिहासीक बारव आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा व कार्याची आठवण करुन देत आहे.
सोनगांव येथे 31 पायऱ्यांचे बारव ज्या मध्ये संपुर्ण मानवजातीसह पशु पक्षाला स्वता पायऱ्यांनी जाउन पाणी पिण्याची सोय आजही जशी ना तशी असुन,सोनगांव तसेच ईतर ठिकाणची बारवेचा आकार (डिझाईन) हा महादेवाच्या पिंडी सारखा असुन त्यामध्ये बारा ही महिने पाणी स्वच्छ व थंड राहते.सोनगांव ता निफाड येथिल बारव हे नाशिक जिल्हातील एकमेव गप्पी मासे पैदास केद्र असुन,आज माञ त्याकडे दुर्लक्ष होउन पडझड झाली असुन अनेक ठिकाणच्या बारवेचे रूपातर कचरा कुडीत झाले असुन लोकप्रति तसेच शासकीय व्यवस्थेने ह्या कडे लक्ष देउन हा ऐतिहासीक पुरावा भावी पिढीला पाहण्यासाठी ,अभ्यासासाठी जतन करुन नाशिक जिल्ह्यातील सर्व बारवेचा दुरूस्ती करण्याची मागणी धनगर समाज्याचे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष श्री भाउसाहेब ओहळ यानी केली आहे.
