नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार


सहसंपादक : रामभाऊ भोयर


पंचायत समिति राळेगाव चे निवृत्त गटशिक्षणाधिकारी शेळके साहेब यांचे जागी राजुभाऊ काकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव येथे रुजू झाले, त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांचे दालनात विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व गट संसाधन केंद्राचे विषय तज्ञ उपस्थित होते..
त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व मिठाई वाटुन हा सोहळा संपन्न झाला.. कार्यक्रमासाठी उपस्थित शेखर ओंकार सर, राजेश शर्मा सर, शंकर मोहुर्ले सर, धम्मानंद तागडे सर ,महेश सोनेकर सर,दुर्गे सर,कुंभलकर सर, गावंडे सर, क्षिरसागर सर, धनराज पुरके सर,कोल्हे सर,माडेवार साहेब आदि उपस्थित होते..
सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी यांनी सर्वांनी मिळून मिसळून सर्व कामे मार्गी लावू, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य माझ्याकडून होईल अशी ग्वाही दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहणकर सर यांनी केले..