
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आठमुर्डी येथे जिल्हा परिषद ची शाळा आहे या शाळेत एक ते आठवर्ग आहे आणि दोन शिक्षक आहे. गावातील शाळा समिती अध्यक्ष यांनी शिक्षक वाढवून देण्याची मागणी सुद्धा एका निवेदनात केली होती शिक्षक तर मिळालेच नाही पण आज बुधवार एकोनविस रोजी रोजी आठमुर्डी येथील विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत गेले असता शाळेच्या दरवाज्याला लाॅक दिसले. विद्यार्थी गेटच्या बाहेर शिक्षकांची बारा वाजेपर्यंत वाट बघत होते पण शिक्षक आलेच नाही. विद्यार्थी घरी वापस गेल्या नंतर पालकांनी विचारले तुम्ही घरी का आले मुलांनी पालकांना सांगितले शाळेला सुट्टी आहे हि माहिती शाळा समिती अध्यक्ष यांना होताच त्यांनी शिक्षकांना फोनवर विचारले असता आम्हाला बि एल ओ च्या ट्रेनींग साठी पाठविले आहे. त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही विशेष म्हणजे आठमुर्डी हे गाव माझी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच हे मुळ गाव आहे याच गावात हा लाजीरवाना प्रकार घडला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण च मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षनाची वाटा लागल्याचे दिसत आहे. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये या बाबीकडे जिल्हा परिषद सिओ तसेच जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष सुनील शिवनकर, योगेश्वर पडाल, सुबोध मेश्राम, मारोती कावडे, अरविंद ठाकरे, अनिल शिवनकर, प्रमोद पुरके इत्यादी हजर होते.
